SBI PO Bharti 2025 : भारतातील सुप्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये निघाली बंपर भरती 2025

SBI PO Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलो आहोत. बऱ्याच नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांना आपल्याला चांगला बँकेत जॉब मिळावा यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर आज आपण अशाच एका बँकेमध्ये सुरू असलेल्या भरती बद्दल सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज लागणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असल्या भरतीमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यात येणार आहे.

भारतातील सुप्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी तुम्हाला 16 जानेवारीपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंतच या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

तर आता आपण स्टेट बँक ऑफ इंडिया साठी कशाप्रकारे अर्ज करायचे आहे त्याचबरोबर कोणत्या पदासाठी ही भरती सुरू आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कोणते शिक्षण लागणार आहे आणि त्याचबरोबर या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय असणार आहे आणि या भरतीसाठी आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे हे आता आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

SBI PO Bharti 2025 Details

मित्रांनो आता आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणते पद आहे आणि त्या पदासाठी तब्बल किती जागा आहेत या संदर्भातील माहिती घेणार आहोत.

पदाचे नाव
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 600 जागा आहेत. जर जर तुम्हाला देखील सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

SBI PO Bharti 2025 Qualification

मित्रांनो आता आपण भारतीय स्टेट बँक मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांसाठी कोणते शिक्षण लागणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत.

भारताचे सुप्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सुरू असलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असावा. म्हणजेच उमेदवार हा इंजिनिअरिंग उत्तीर्ण जरी असला तरी उमेदवार हा या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.

SBI PO Bharti 2025 Age Limit

मित्रांनो आता आपण भारतीय स्टेट बँक मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे किती असणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती घेणार आहोत. म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी अर्ज करताना भारतीय स्टेट बँकेने उमेदवाराचे वय हे किती ठरवलेले आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

भारतातील सुप्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुम्हाला नोकरी मिळवायचे असेल तर तुमचे वय हे 21 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे त्याचबरोबर SC/ST उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आले आहे आणि PWD (General/EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षाची सूट देण्यात आली आहे.

मित्रांनो जर तुमचे वय हे या भरतीसाठी योग्य असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आणि तुम्ही एक चांगली सरकारी नोकरी मिळू शकणार आहात.

SBI PO Bharti 2025 Important Information

तर मित्रांनो भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नोकरीच्या ठिकाणी काय असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी आपल्याला किती वेतन मिळणार आहे त्यानंतर अर्ज करताना आपल्याकडून किती रुपये शुल्क आकारले जाणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत आहे म्हणजेच उमेदवारांना भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

वेतन : भारतीय स्टेट बँकेमध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळाल्यावर महिन्याला 40,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

शुल्क : तर मित्रांनो General/EWS/OBC या प्रवर्गातील लोकांना 750 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ST/PWD या प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

SBI PO Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)

मित्रांनो आता आपण भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपली निवड कशाप्रकारे होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो आपली निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. म्हणजेच आपल्याला तीन टप्प्यांमध्ये परीक्षा द्यावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रिलिम्स परीक्षा द्यावी लागणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल तर आता आपण याबद्दलच थोडक्यात माहिती घेणार आहोत.

सर्वात प्रथम आपण प्रिलिम्स परीक्षा यासंदर्भात माहिती घेणार आहोत यामध्ये 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे ते आता आपण एका टेबलद्वारे पाहूया.

क्र. नं.चाचणीचे नावप्रश्नांची संख्यागुणकालावधी
1इंग्रजी भाषा / English Language404020 मिनिटे
2गणितीय क्षमता / Quantitative Aptitude303020 मिनिटे
3तर्क करण्याची क्षमता / Reasoning Ability303020 मिनिटे

मित्रांनो वर दिलेल्या टेबल मध्ये आपली तीन विषयांमध्ये परीक्षा होणार आहे सर्वात प्रथम आपली इंग्रजी भाषा या विषयाची परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपल्याला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या प्रश्नांसाठी 40 गुण असणार आहे यामध्ये वीस मिनिटांचा कालावधी आपल्याला देण्यात येणार आहे. त्यानंतर आपली गणितीय क्षमता तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यामध्ये आपल्याला 30 गुण असणार आहे आणि यासाठी आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर आपल्याला तर्क करण्याची क्षमता / Reasoning Ability या संबंधित परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यासाठी आपल्याला 30 गुण देणार आहेत यामध्ये वीस मिनिटांचा कालावधी आपल्याला भेटणार आहे.

तर मित्रांनो आता आपण मुख्य परीक्षा (Main Exam) कशी असणार आहे त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊया. मुख्य परीक्षा मध्ये दोन भाग असणार आहेत पहिल्या भागामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतली जाणार आहे त्यामध्ये 200 गुण असणार आहेत आणि याची वेळ तीन तासाची असणार आहे त्यानंतर डेस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये 50 गुण असणार आहेत. आता आपण या संदर्भातील माहिती एका टेबलद्वारे पाहणार आहोत.

चाचणीचे नावप्रश्नांची संख्याजास्तीत जास्त गुणकालावधी
तर्कशक्ती आणि संगणक योग्यता406050 मिनिटे
डेटा विश्लेषण आणि व्याख्या306045 मिनिटे
सामान्य ज्ञान / अर्थव्यवस्था / बँकिंग ज्ञान606045 मिनिटे
इंग्रजी भाषा402040 मिनिटे
एकूण170200तास

वर दिल्या टेबल मध्ये आपण मुख्य परीक्षेमधील ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बद्दल माहिती घेतली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी एकूण 3 तास आपल्याला देणार आहेत. तीन तासाच्या आत मध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर तुमची डेस्क्रिप्टिव्ह टेस्ट (वर्णनात्मक परीक्षा) 50 मार्कांसाठी घेतली जाणार आहे.

आता आपण तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये मानसिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याचबरोबर गटचर्चा देखील घेण्यात येणार आहे. हे झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे.

अशाप्रकारे उमेदवारांची या भरतीसाठी निवड प्रक्रिया होणार आहे जर तुम्हाला निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास भारतीय स्टेट बँकेने प्रदर्शित केलेली जाहिरात तुम्ही वाचून घ्यायचे आहे.

SBI PO Bharti 2025 Important Dates & Apply

मित्रांनो आता आपण भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपल्याला किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे त्याचबरोबर कोणत्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय स्टेट बँकेमध्ये अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 16 डिसेंबर 2025 आहे. तर ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 16 तारखेच्या आतच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांची प्रिलिम्स परीक्षा परीक्षाही 08 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान घेण्यात येणार आहे.

आता आपण खालील टेबल मध्ये भारतीय स्टेट बँकेने प्रदर्शित केलेले जाहिरात त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट या संदर्भातील माहिती एका टेबलद्वारे पाहणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
नागपूर महापालिकेची वेबसाईटhttps://sbi.co.in/

SBI PO Bharti 2025 How To Apply

मित्रांनो आता आपण भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आहे सर्व प्रथम जाणून घेणार आहोत.

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थितरित्या जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  2. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्जावर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  3. त्यानंतर उमेदवारांना आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्या ऑनलाइन फॉर्म मध्ये भरावे लागणार आहेत.
  4. त्याचबरोबर आपल्याला अनुभव असलेले कागदपत्रे देखील लावायचे आहे.
  5. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म मध्ये तुम्हाला पासपोर्ट फोटो देखील लावायचा आहे.
  6. हे सर्व झाले तर तुम्हाला या भरतीसाठी आवश्यक असणारी फी देखील भरायचे आहे.
  7. अशा प्रकारे फॉर्म भरून झाल्यावर नंतर आपण तो फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घ्यावे. जर फॉर्म मध्ये काय बदल करायचे असते ते उमेदवारांनी तो फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.

अशाप्रकारे उमेदवारांनी भारतीय स्टेट बँकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे.

Leave a Comment