Nagpur Municipal Corporation Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी निघाली बंपर भरती 2025

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 : मित्रांनो जर तुम्ही जॉब शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासमोर एक महत्त्वाच्या अशा जॉब बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. तर नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकत आहात. यामध्ये उमेदवारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सरकारी काम मिळण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर तुमची नागपूर महानगरपालिकेमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नागपूर महापालिकांमध्ये विविध पदांसाठी म्हणजेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत), नर्स परीचारीका (GNM), वृक्ष अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

नागपूर महानगरपालिका मध्ये पाच पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 245 जागा असणार आहेत. जर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 या तारखेपर्यंतच अर्ज करू शकता.

मित्रांनो आता आपण नागपूर महानगरपालिका मध्ये सुरू असलेल्या भरती संबंधित माहिती पाहणार आहोत म्हणजेच कोणकोणते पदे या भरतीसाठी असणार आहेत त्याचबरोबर कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कोणते शिक्षण लागणार आहे आणि या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे हे आता आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Details

आता आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये जे पद आहेत त्या पदांसाठी एकूण किती जागा आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती एका टेबलद्वारे जाणून घेणार आहोत.

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)36
2.कनिष्ठ अभियंता (विद्युत)03
3.नर्स परीचारीका (GNM)52
4.वृक्ष अधिकारी04
5.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक150

मित्रांनो वरील दिलेल्या टेबल मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी तब्बल 36 जागा आहेत त्याचबरोबर या पदाचे मुख्य काम म्हणजे नागरी प्रकल्पाचे नियोजन आणि देखरेख करणे होय. त्यानंतर कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदासाठी फक्त 03 जागा असणार आहेत त्याचबरोबर या पदाचे मुख्य काम हे विद्युत प्रणालीचे व्यवस्थापन आणि देखभाल करणे आहे. त्यानंतर आता आपण नर्स परिचारिका बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. नर्स परिचारिका या पदासाठी एकूण 52 जागा आहे यामध्ये नर्स परिचारिकाऱ्यांना रुग्णांची काळजी घेणे व वैद्यकीय मदत प्रदान करणे असणार आहे.

आता आपण वृक्ष अधिकारी बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. वृक्ष अधिकारी साठी फक्त 04 जागा आहे यामध्ये त्यांचे मुख्य काम हे नागरी भागात झाडांची लागवड व संवर्धन करणे असणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त जागा असणारे पद म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे या पदासाठी तब्बल 150 जागा आहे या पदाचे मुख्य काम म्हणजे शहरातील सुरू असलेले स्थापत्य काम यामध्ये त्यांना त्यांची भूमिका बजवायची आहे.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Qualification

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये जी पद आहेत त्या पदांसाठी कोणते शिक्षण लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकी ह्या क्षेत्राची पदवी असणे गरजेचे आहे.

2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) : कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदासाठी उमेदवाराकडे विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी ह्या क्षेत्राची पदवी असणे गरजेचे आहे.

3) नर्स परीचारीका (GNM) : नर्स परीचारीका (GNM) या पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असून उमेदवाराने GNM नर्सिंग केलेले असावे.

4) वृक्ष अधिकारी : वृक्ष अधिकारी या पदासाठी उमेदवार हा B.Sc (हॉर्टिकल्चर)/ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री/वनस्पतीशास्त्रातील ह्या क्षेत्रातून उत्तीर्ण असावा.

5) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.

मित्रांनो नागपूर महापालिकेमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना वरील शिक्षण लागणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण वरील दिलेल्या क्षेत्रात झाले असल्यास त्यांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवली पाहिजे.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Age Limit

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नागपूर महापालिकेने काही वयोमर्यादा ठरवलेले आहे यामध्ये कोणती वयोमर्यादा लागणार आहे यात आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

मित्रांनो नागपूर महापालिकेमध्ये एकूण पाच पदे आहेत त्या पाच पर्यंत साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे जर उमेदवार हा मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल गट (आ.दु.घ.) किंवा अनाथ अशा उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.

तर मित्रांनो जर तुमचे वय हे या भरतीसाठी योग्य असेल तर तुम्ही दिलेल्या इतर पाच पदासाठी अर्ज करू शकणार आहात आणि सरकारी नोकरी मिळू शकणार आहात.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Important Information

तर मित्रांनो आता आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे त्याचबरोबर आपल्याला किती पगार मिळणार आहे आणि आपल्याला अर्ज करताना किती शुल्क भरायचे आहे हे आता आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : नोकरी ठिकाण हे नागपूर आहे.

वेतन : नागपूर महानगरपालिकेमध्ये मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळाल्यावर महिन्याला 25,500 रुपये ते 1,22,800 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

शुल्क : अराखीव उमेदवारांकडून 1000 रुपये शुल्क घेतले जाणार आहे आणि उमेदवार हा मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल गट (आ.दु.घ.) किंवा अनाथ या प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवारांकडून 900 रुपये इतके शुल्क घेतले जाणार आहे.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपली कशाप्रकारे निवड होणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

  • नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा म्हणजेच (MCQ) द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.
  • ही परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
  • या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत. आणि परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असणार आहे.
  • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना या परीक्षेमध्ये 50% गुण मिळवणे गरजेचे आहे.
  • जर उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक (EWS), व विशेष मागास प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवारांना 45% गुण मिळवणे बंधनकारक आहे.
  • परीक्षा झाल्यानंतर तुमची मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

तर मित्रांनो तुमची MCQ द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर तुमची मुलाखत देखील घेतली जाणार आहे यानंतर तुमची निवड करण्यात येणार आहे जर तुम्हाला निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास तुम्ही नागपूर महापालिकेने प्रदर्शित केलेली जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 Important Dates & Apply

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये आपण किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे आणि कोणत्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ज्या उमेदवारांना नागपूर महापालिकेमध्ये अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 या तारखेपर्यंतच अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी नागपूर महापालिकेने प्रदर्शित केलेली जाहिरात त्याच बरोबर ऑनलाईन अर्जाची वेबसाईट आणि त्यांची नागपूर महापालिकेची मुख्य वेबसाईट यासंदर्भातील एका टेबल द्वारे माहिती घेणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
नागपूर महापालिकेची वेबसाईटhttps://nmcnagpur.gov.in/

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 How To Apply

मित्रांनो आता आपण नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आहे हे आता आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

  1. सर्वात प्रथम उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेने प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
  2. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करून तिथे आपले खाते चालू करायचे आहे.
  3. अर्ज करताना उमेदवारांनी जी पदे आहेत अशा पदांसाठी स्वतंत्र पणे अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड या संदर्भातील संपूर्ण माहिती त्या अर्जामध्ये भरायचे आहे.
  5. अर्ज करत असताना उमेदवारांना शुल्क देखील भरायचे आहे.
  6. शुल्क भरून झाल्यानंतर आपण तो अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे. जर अर्ज मध्ये काही माहिती राहिल्यास ती अर्ज सबमिट करण्यापूर्वीच उमेदवारांनी भरून घ्यायचे आहे.
  7. त्यानंतर उमेदवारांनी हा फॉर्म सबमिट करायचा आहे.

अशाप्रकारे उमेदवारांनी नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि सरकारी नोकरी मिळवायचे आहे.

Leave a Comment